शांता वर्ल्ड मधे आपले मनापासुन स्वागत.

क्षण साजरा करूया !!!

 

“ एका क्षणात दृष्टीकोन बदलण हे साधासुध स्थित्यांतर नाही. जगातील सर्वात अवघड गोष्ट म्हणजे विचार बदलणे. इतर गोष्टी केंव्हाही बदलता येतात. आज आवडलेली गोष्ट, उद्या फेकून देता येते पण नवा विचार स्वीकारणं ही खूप मोठी घटना आहे, तो क्षण साजरा केलाच पाहिजे.
खरोखरच व. पू. चे हे वाक्य किती उद्बोधक सत्य आहे. दृष्टीकोनात बदल घडवणे आणि नवीन विचारांच्या अनुषंगाने कृती करणे ही खरोखरच करायला अवघड अशी घटना आहे.
पर्यटनाच्या व्यवसायात असल्यामुळे ही गोष्ट वारंवार जाणवते , परंतु एकदा का दृष्टीकोण बदलला की नंतरचे आयुष्य खूप सोपं होत जातं . आता बघा ना .. सुरुवारीला फक्त Family टुर्स ला वाव असायचा , कालांतराने मागणी तसा पुरवठा या कार्पोरेट तंत्रानुसार customized टुर्स ,student स्पेशल टुर्स , महिलांकरिता स्पेशल टुर्स ,सेकंड innings  अशा अनेक प्रकारच्या पर्यटनातून पर्यटकांची पसंती मिळायला लागली . पर्यटन हे कुठल्याही काळाचे , वयाचे, वर्षातील काही विशिष्ट महिन्यांशी संबंधित आहे हा जुना विचार मागे पडला आणि पर्यटन round the clock आणि round the year  ही नवी संकल्पना जनमानसात रुजली.
आज प्रत्येक व्यक्तींच्या आवडीनुसार आणि सवडीनुसार पर्यटनाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. हे नवीन स्थित्यांतरच आहे.
समाजात पर्यटनाविषयी असलेल्या दृष्टीकोनात काही वर्षात अगदी अमुलाग्र बदल झालाय. पर्यटन म्हणजे संसारातील सर्व जबाबदाऱ्या संपल्यावर फावल्या वेळेत आणि उरलेल्या पैशात करायची गोष्ट  ही संकल्पना केंव्हाच मागे पडली आणि संसारातील जबाबदाऱ्या पार पडत देखील हा आनंद उपभोगता येतो हा विचार रुजला , नवीन विचारांचे समाजातून स्वागतच झाले, नव्हे ….ह्याला जीवनशैलीत समाविष्ट करण्यात आले.
…..त्यामुळे आजचा क्षण खरोखरच साजरा केला पाहिजे….बरोबर वपू अगदी बरोबर……